Jalgaon train accident : आगीच्या अफवेमुळं अनेकांचा मृत्यू; जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना, नेमकं काय घडलं?
Jalgaon train accident : जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच ट्रेनमधील 30 ते 35 जणांनी उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.