राज्यात काही भागात अवकाळी पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे काही ठिकाणी उकाडाही वाढला आहे. मुंबईमध्ये तापमान वाढ झालेली दिसून आली आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. शेतमजुराचा शेतात काम करत असताना उन्हाच्या तडाख्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा जळगाव जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी आहे.
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. उन्हामुळे त्याला चक्कर त्यानंतर तो शेतात खाली कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सांगण्यात आली आहे.