पॅन्टमध्ये हात घातला नंतर…. भररस्त्यात गरोदर महिलेशी अश्लील चाळे, CCTV व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने दिवसाढवळ्या भरवस्तीत एका गरोदर महिलेचा विनयभंग केल्याने संपूर्ण शहरात संताप व्यक्त होत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सुरक्षिततेच्या दाव्यावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भरवस्तीत धक्कादायक कृत्य; पीडितेने दाखवली हिम्मत

ही घटना जयपूरमधील मालवीय नगर परिसरात घडली आहे. २५ मार्च रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास एक गरोदर महिला आपल्या वस्तीतून फोनवर बोलत जात होती. यावेळी रस्ता शांत असल्याचे पाहून पाठीमागून आलेल्या एका विकृत तरुणाने महिलेला मागून पकडले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला सुरुवातीला हादरली, मात्र तिने तातडीने प्रसंगावधान राखत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलेच्या आवाजामुळे लोक जमतील या भीतीने आरोपीने तिथून पळ काढला.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि सीसीटीव्ही फुटेज

हा सर्व प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र २५ मार्च रोजी ही घटना घडूनही पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप होत आहे. पोलिसांच्या या ढिम्म कारभारावर नागरिकांकडून तीव्र टीका केली जात आहे. गरोदर महिलेच्या सुरक्षेबाबत इतका निष्काळजीपणा कसा काय केला जाऊ शकतो, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

तपासाचे आदेश

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि संतापाची लाट उसळल्यानंतर जयपूर पूर्वच्या डीसीपी रंजीता शर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्याला लवकरच बेड्या ठोकल्या जातील. तसेच, सुरुवातीला तक्रार का नोंदवण्यात आली नाही, या संदर्भातही त्यांनी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.