Vice President Candidate: Jagdeep Dhankhar हे NDAचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

WhatsApp Group

नवी दिल्ली: जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) हे पश्चिम बंगालचे राज्यपाल एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की जगदीप धनखर हे भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार असतील. अनेक नावं पाहिल्यानंतर आम्ही एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड हेच ठरविले आहे.