Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला आग, व्हिडिओ व्हायरल

0
WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या बिल्डिंगमधून धुराचे लोट निघताना दिसत आहे. अग्निशमन दलाची गाडीही तिथे आग विझवताना दिसली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही आग एका घरातील स्वयंपाकघरात लागली होती. या सगळ्यात जॅकलिन फर्नांडिस सुखरूप असल्याचे रिपोर्ट्समध्ये साग्न्यात आले आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जॅकलीन फर्नांडिस राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे दिसत आहे. मात्र, आग जास्त पसरण्याआधीच अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच तेथे पोहोचून आग विझवली, त्यामुळे अद्याप कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

या चित्रपटांमध्ये दिसणार जॅकलीन 
अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. जॅकलिन शेवटची अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये एका गाण्यात त्याची खास भूमिका होती. सध्या ती ‘फतेह’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.