
मुंबई – शिवसेना (ShivSena) नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. मुख्यमंतत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची खाती काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आला आहे आहे.