BAN vs IND: “छोटा पॅकेट बडा धमाका”, इशान किशनने तिसऱ्या वनडेत बांगलादेशचा उडवला धुव्वा, झळकावले झंझावाती शतक

WhatsApp Group

भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (Ind vs Ban ODI Series 2022) चट्टोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि धवन पाचव्या षटकातच 3 धावा काढून बाद झाला. यानंतर इशान किशनला विराट कोहलीची साथ लाभली आणि त्याने वेगवान धावा करत आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे पहिलं आंतरराष्ट्रीय शतक आहे.

दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माच्या जागी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळत असलेल्या इशानने 85 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. याआधी त्याने 8 डावात 3 अर्धशतकेही केली आहेत. ईशान त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. चट्टोग्राम वनडेतही शिखर धवन सुरुवातीलाच बाद झाला. असे असूनही इशानची बॅट थांबली नाही आणि त्याने वेगाने धावा करणे सुरूच ठेवले.