Ishan kishan : तुफान खेळी दाखवत ईशान किशनने मोडला गौतम गंभीरचा ‘हा’ विक्रम

WhatsApp Group

भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या डावात 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या. संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात ऋतुराज गायकवाडच्या 57 धावा आणि इशान किशनच्या 54 धावांचा मोलाचा वाटा होता.

इशान किशनचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे टी-20 मधले पहिले अर्धशतक होते, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपातील हे त्याचे चौथे अर्धशतक होते. किशनचा हा 13वा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्याने 13 डावांमद्धे 453 धावा करत गौतम गंभीरचा विक्रम मोडला आहे.

टी-20 मध्ये, इशान किशनने 13 सामन्यांच्या 13 डावात 37.75 च्या सरासरीने 453 धावा केल्या आहेत. आता तो भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या 13 डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने गौतम गंभीरचा विक्रम मोडला ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या पहिल्या 13 डावात 415 धावा केल्या होत्या आणि तो इशान किशनच्या पुढे आता तिसऱ्या स्थानावर होता. किशनने आता गंभीरला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे.

भारतासाठी टी-20 क्रिकेटच्या पहिल्या 13 डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने 500 धावा केल्या आहेत, तर विराट कोहली 461 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. किशन 453 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर गंभीर 415 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. युवराज सिंग 390 धावांसह पाचव्या तर रोहित शर्मा 320 धावांसह सहाव्या स्थानावर आहे.

टी-20 मध्ये 13 डावांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप 6 फलंदाज 

  • 500 धावा – केएल राहुल
  • 461 धावा – विराट कोहली
  • 453 धावा – इशान किशन
  • 415 धावा – गौतम गंभीर
  • 390 धावा – युवराज सिंग
  • 320 धावा – रोहित शर्मा