हा धोनी आहे का? तुमचं उत्तर हो असेल तर चूकताय तुम्ही? वाचा बातमी

0
WhatsApp Group

काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये साऊथचा सुपरस्टार रजनीकांत सारखा दिसणारा एक माणूस  होता. त्या व्यक्तीचा चेहरा रजनीकांत सारखाच होता की दुरून पाहिल्यावरही कोणाचा विश्वास बसत नव्हता की तो रजनीकांत नाही. आता आणखी एका प्रसिद्ध स्टारचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण कधी-कधी असे व्हिडिओ बघायला मिळतात जे पाहिल्यानंतर माणसाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारखा दिसत आहे. या व्यक्तीने आपल्या केसांना धोनीसारखा लूकही दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Malakar (@eshu.7781)

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर eshu.7781 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 95 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – सर, मला तुम्हाला भेटायचे आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले – फरक फक्त 19-20%  आहे.