रोहित आणि विराटचे नाव न घेता इरफान पठाणने साधला निशाणा, म्हणाला…

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिजमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. यानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने एक ट्वीट केलं आहे या ट्वीटमध्ये त्याने विश्रांती घेतल्यानंतर कोणीही फॉर्ममध्ये येत नाही असं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्याने कोणत्याही क्रिकेटपटूचे नाव घेतले नसले तरी त्याचे लक्ष्य टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्याकडे होते हे सर्वांनाच माहीत आहे, जे सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील संघाची कमान शिखर धवनच्या हाती असेल. गेल्या सात महिन्यांत टीम इंडियाचे आठ कर्णधार बदलले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटीत विराट कोहली आणि एकदिवसीय सामन्यात केएल राहुलच्या हातात होते. यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार होता. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिका मालिकेत केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंतकडे कर्णधारपद होते.

आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्या कर्णधार होता. इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत रोहित शर्माची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जसप्रीत बुमराहने कर्णधारपद भूषवले. यादरम्यान आयर्लंडला गेलेल्या संघाने इंग्लंडमध्ये दोन सराव सामने खेळले. या दोन सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने कर्णधारपद भूषवले होते. आता शिखर धवन वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार असेल.

विराट कोहलीच्या फॉर्मबाबतही चिंता कायम आहे. दोन डावात 11 आणि 20 धावा करून तो बाद झाला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत इरफान पठाणने आउट ऑफ फॉर्म विराट आणि रोहितवर निशाणा साधला आहे.