इराणने होर्मुजची ‘सामुद्रधुनी’ खुली केली; भारतासाठी एकाच वेळी 3 ट्रिपल खूशखबर! शेअर बाजार ते सोन्या-चांदीच्या दरात मोठी हालचाल

WhatsApp Group

गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इराण-इस्रायल संघर्षात आता मोठी आणि सकारात्मक घडामोडी घडली आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) विस्कळीत झाली होती, विशेषतः ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद असल्याने आर्थिक संकट ओढवले होते. मात्र, आता इराणने हा मार्ग व्यापारासाठी पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे भारतासाठी तीन महत्त्वाच्या आघाड्यांवर आनंदाची बातमी आली आहे.

१. शेअर बाजारात ‘सोमवार’ ठरणार ऐतिहासिक! होर्मुजचा मार्ग उघडल्याचा सर्वात मोठा आणि सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर ही बातमी आली असली तरी, ‘गिफ्ट निफ्टी’ने (Gift Nifty) तब्बल ४०० अंकांची (जवळपास २ टक्के) झेप घेतली आहे. याचा अर्थ असा की, सोमवारी सकाळी जेव्हा भारतीय शेअर बाजार उघडेल, तेव्हा गुंतवणूकदारांना मोठी तेजी पाहायला मिळेल. कच्चे तेल स्वस्त होण्याच्या शक्यतेमुळे ऑइल मार्केटिंग कंपन्या (HPCL, BPCL, IOC) तसेच पेंट, टायर आणि एव्हिएशन क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे.

२. चांदी आणि सोन्याच्या दरात विक्रमी उसळी सहसा भू-राजकीय तणाव कमी झाल्यावर सोन्या-चांदीचे भाव कमी होतात, मात्र यावेळी चित्र वेगळे आहे. युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरत होते. आता तणाव निवळताच गुंतवणूकदारांचा विश्वास परतला असून सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून आली आहे.

  • चांदी: MCX वर चांदी ५ टक्क्यांच्या वाढीसह २.६१ लाख रुपये प्रति किलो या ऐतिहासिक स्तरावर पोहोचली आहे.

  • सोने: सोन्याच्या दरातही १.५० टक्क्यांची वाढ झाली असून, १० ग्रॅम सोन्याचा भाव १.५५ लाख रुपये इतका झाला आहे.

३. महागाईपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा? जगातील २० टक्के तेल आणि गॅस होर्मुजच्या सामुद्रधुनीतून प्रवास करतो. हा मार्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होईल. यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहण्यास किंवा कमी होण्यास मदत होईल. भारतासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे, कारण यामुळे देशांतर्गत इंधन दरावर नियंत्रण राहील आणि परिणामी वाहतूक खर्च कमी होऊन महागाईवर लगाम बसू शकेल.