गुजरात : इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या गुजरात टायटन्स संघाने आपला अधिकृत लोगो जाहीर केला आहे. गुजरात टायटन्सचा हा लोगो त्रिकोणाच्या आकारात काढण्यात आला आहे. गुजरात संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे तर आशिष नेहरा संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. गुजरात संघाने आपल्या ट्विटर हँडलवर आपला हा नवा लोगो शेअर केला आहे.
गुजरात संघाने यापूर्वीच आपल्या कोचिंग स्टाफची निवड केली आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा असेल तर इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी यांना संघाचे संचालक बनवण्यात आले आहे.त्याचबरोबर भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे संघाचे मार्गदर्शक असतील.
????????♀️Step into the Titans Dugout! ▶️ Watch our stars unveil the logo in the metaverse! ⭐ ▶️ https://t.co/dCcIzWpM4U#GujaratTitans pic.twitter.com/9N6Cl6a3y4
— Gujarat Titans (@gujarat_titans) February 20, 2022
असा आहे गुजरात टायटन्सचा संघ – हार्दिक पंड्या, रशीद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, विजय शंकर, जयंत यादव, डॉमिनिक ड्रेक, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी प्रदीप जोसे, यश दयाल डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, वरुण आरोन, बी साई सुदर्शन