IPL 2023: ‘या’ खेळाडूला मिळालं सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपद

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आधी सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामला Aiden Markram संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. मार्करामने त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका T20 लीगमध्ये सनरायझर्स इस्टर्न केप या सनरायझर्सच्या मालकीचा संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. दक्षिण आफ्रिका T20 लीगच्या अंतिम सामन्यात मार्करामने अंतिम सामन्यात 1 विकेट घेतला होता तर फलंदाजीत 19 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या होत्या.

एडन मार्करामला आयपीएलमध्ये फक्त 20 सामन्यांचा अनुभव: मार्करामने आतापर्यंत आयपीएलमध्ये 20 सामने खेळले आहेत. त्याने 134.10 च्या स्ट्राईक रेटने 527 धावा केल्या. त्याची सरासरी 40.54 होती आणि त्याने 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याच वेळी, गेल्या वर्षी त्याने आयपीएलच्या 14 सामन्यांमध्ये 47.63 च्या सरासरीने 381 धावा केल्या होत्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 68 धावा होती.

केन विल्यमसनला सनरायझर्स हैदराबादने केले रिलीज : IPL 2022 मध्ये संघाचा कर्णधार असलेल्या केन विल्यमसनला IPL 2023 च्या लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने सोडले होते. लिलावातही संघाने त्याला पुन्हा विकत घेतले नाही. अशा परिस्थितीत SRH नवीन कर्णधाराच्या शोधात होता. मयंक अग्रवाल किंवा एडन मार्कराम या दोघांपैकी एकाला कर्णधार बनवण्याची अपेक्षा होती.


एडन मार्करामने त्याच्या नेतृत्वाखाली नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये ईस्टर्न केप फ्रँचायझी संघाला विजेतेपद मिळवून दिला. एडन मार्करामने SA20 लीगच्या 12 सामन्यांमध्ये 33.27 च्या सरासरीने आणि 127.97 च्या स्ट्राइक रेटने 366 धावा केल्या.