धोनीपेक्षा जडेजाला मिळाले जास्त पैसे, पाहा कोणते खेळाडू कोणत्या संघाने केले रिटेन

WhatsApp Group

मुंबई – आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी सध्याच्या आठही संघाने मंगळवारी त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पाहूयात कोणत्या संघाने कोणते खेळाडू केले रिटेन…

एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या मोठ्या खेळाडूंना त्यांच्या विद्यमान संघाने आयपीएल 2022 साठी आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड


कोलकाता नाइट रायडर्स – सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर


सनरायझर्स हैदराबाद – केन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक


मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज


दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे


राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन, जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल


पंजाब किंग्स – मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंह

खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या विद्यमान संघ मालकांना नियम असा होता की, पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये असे एकूण 42 कोटी असेल खर्च करू शकतील. आयपीएल 2022 च्या मोसमासाठी सर्व संघ एकूण 90 कोटी रुपये खेळाडूंवर खर्च करू शकतात.