IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्याला मिळते पर्पल कॅप, जाणून घ्या आतापर्यंतच्या पर्पल कॅप विजेत्यांबद्दल

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग 26 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलने केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला अनेक नवे खेळाडू दिले आहेत. आयपीएलमध्ये चांगली फटकेबाजी करत एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप तर एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप purple cap दिली जाते.

IPL सुरू झाल्यापासून म्हणजेच 2008 पासून पर्पल कॅप देण्याचा ट्रेंड आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सोहेल तन्वीरने सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. तर आयपीएलच्या इतिहासात चेन्नईच्या ड्वेन ब्राव्हो Dwayne Bravo आणि सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने Bhuvneshwar Kumar प्रत्येकी दोन वेळा पर्पल कॅप जिंकली आहे.

गेल्या १४ मोसमात पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज

  • सोहेल तन्वीर, राजस्थान रॉयल्स, 22 विकेट्स, 2008
  • आरपी सिंग, डेक्कन चार्जेस, 23 विकेट्स, 2009
  • प्रज्ञान ओझा, डेक्कन चार्जेस, 21 विकेट्स, 2010
  • लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्स, 28 विकेट्स, 2011
  • मोर्ने मॉर्केल, दिल्ली डेअरडेव्हिल्स, 25 विकेट्स, 2012
  • ड्वेन ब्राव्हो, चेन्नई सुपर किंग्ज, 32 विकेट्स, 2013
  • मोहित शर्मा, चेन्नई सुपर किंग्ज, 23 विकेट्स, 2014
  • ड्वेन ब्राव्हो, चेन्नई सुपर किंग्ज, 26 विकेट्स, 2015
  • भुवनेश्वर कुमार, सनरायझर्स हैदराबाद, 23 विकेट्स, 2016
  • भुवनेश्वर कुमार, सनरायझर्स हैदराबाद, 26 विकेट्स, 2017
  • अँड्र्यू टाय, किंग्ज इलेव्हन पंजाब, 24 विकेट्स, 2018
  • इम्रान ताहिर, चेन्नई सुपर किंग्ज, 26 विकेट्स, वर्ष 2019
  • कागिसो रबाडा, दिल्ली कॅपिटल्स, 30 विकेट्स, वर्ष 2020
  • हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 32 विकेट्स, 2021

महत्वाच्या बातम्या 

ठाकरेंच्या कुटुंबापर्यंत पोहोचली ED: उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांच्या कंपनीचे 6.5 कोटी किमतीचे 11 फ्लॅट सील, मनी लाँड्रिंगचा संशय

IPL: अमित मिश्राच्या नावावर सर्वाधिक हॅट्रिक्स, दुसऱ्या स्थानी आहे युवराज सिंग!

जाणून घ्या आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या 3 खेळाडूंबद्दल

धान उत्पादक शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी तत्काळ वितरित करणार, अजित पवारांची विधानसभेत माहिती