IPL Orange Cap Winners List: ऑरेंज कॅप विजेत्यांची संपूर्ण यादी

WhatsApp Group

IPL Orange Cap Winners List: आयपीएलचा हा 17वा सीझन सुरू आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मिचेल मार्शचा भाऊ शॉन मार्शच्या नावावर होता. त्याने पंजाब किंग्ज इलेव्हन, आता पंजाब किंग्जसाठी 616 धावा केल्या. दुसरीकडे, महान सचिन तेंडुलकर 2010 मध्ये 618 धावा करत ही ऑरेंज कॅप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 3 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे, तर ख्रिस गेलने ही कॅप दोनदा जिंकली आहे. गेल्या हंगामाबद्दल बोलायचे तर, भारतीय स्टार फलंदाज शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या होत्या, सध्या तो गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. त्याने 890 धावा केल्या होत्या, तर त्याचा संघ उपविजेता होता. त्याला अंतिम फेरीत चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या फलंदाजांची संपूर्ण यादी

वर्ष  नाव  रन संघ 
2008 शॉन मार्श 616 पंजाब किंग्स
2009 मॅथ्यू हेडन 572 चेन्नई सुपर किंग्स
2010 सचिन तेंडुलकर 618 मुंबई इंडियंस
2011 ख्रिस गेल 608 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
2012 ख्रिस गेल 733 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
2013 मायकेल हसी 733 चेन्नई सुपर किंग्स
2014 रॉबिन उथप्पा 660 कोलकाता नाइट रायडर्स
2015 डेव्हिड वॉर्नर 562 सनरायझर्स हैदराबाद
2016 विराट कोहली 973 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
2017 डेव्हिड वॉर्नर 641 सनरायझर्स हैदराबाद
2018 केन विलियमसन 735 सनरायझर्स हैदराबाद
2019 डेव्हिड वॉर्नर 692 सनरायझर्स हैदराबाद
2020 केएल राहुल 670 पंजाब किंग्स
2021 ऋतुराज गायकवाड 635 चेन्नई सुपर किंग्स
2022 जोस बटलर 863 राजस्थान रॉयल्स
2023 शुभमन गिल 890 गुजरात टायटन्स