IPL: आयपीएलमधील चिअर लीडर्सना किती पगार मिळतो? कमाई ऐकाल तर हैराण व्हाल

0
WhatsApp Group

IPL ही जगातील सर्वात श्रीमंत T20 लीग म्हणून ओळखली जाते. आयपीएलइतके मनोरंजन इतर कोणत्याही लीगमध्ये नाही. या लीगमध्ये केवळ क्रिकेट ॲक्शनच नाही तर नृत्य आणि संगीतही पहायला मिळते. प्रत्येक चौकार आणि षटकारवर चीअरलीडर्स नृत्य करतात, ज्यामुळे सामने पाहायची मज्जा अजून येते.

आयपीएलमध्ये सहभागी होणारे चीअरलीडर्स कुठून येतात? त्यांना पगार किती? ते एका हंगामात किती कमावतात? चला जाणून घेऊया एका सामन्यासाठी किती पैसे दिले जातात, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…

 

View this post on Instagram

 

A post shared by Josie Lauren (@josielauren23)

सर्व चीअरलीडर्स युरोपातील छोट्या-मोठ्या शहरांतील असून एजन्सींमार्फत आयपीएलमध्ये येतात. लीगमध्ये येणाऱ्या चीअरलीडर्सना पॅकेज दिले जाते. त्यानुसार त्या काम करतात. त्यांना जास्तीत जास्त 20 हजार डॉलर्सचे पॅकेज दिले जाते. भारतीय चलनात ही रक्कम 17 लाख रुपयांपर्यंत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neel shakya♥️ (@neel_shakya)

पॅकेज व्यतिरिक्त, चीअरलीडर्सना पगारासह पार्टी परफॉर्मन्स बोनस आणि एलिमिनेटर बोनस वेगळा दिला जातो. जेव्हा संघ अंतिम फेरीत पोहोचतो तेव्हा संघासाठी काम करणाऱ्या चीअरलीडर्सना वेगळा बोनस दिला जातो.