IPL 2025 : धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर; चेन्नई संघाची कमान पुन्हा ‘थाला’च्या हाथी?

WhatsApp Group

IPL 2025 : अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत राहणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर सर्व भारतीय चाहत्यांना हवे आहे. आता चेन्नई सुपर किंग्जचे माजी खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळला तर त्याने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी म्हंटलं.

सुब्रमण्यम बद्रीनाथ म्हणाले की, “धोनीशिवाय दुसरा कोणताही खेळाडू संघाचे कर्णधारपद सांभाळू शकत नाही. अशा परिस्थितीत संघाच्या भल्यासाठी धोनीनेच हा निर्णय घ्यावा. त्याने एकतर कर्णधारपद स्वीकारावे किंवा हंगाम सोडावा. धोनी मैदानात असताना कर्णधाराला तयार करणे अवघड असते, कारण धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. धोनी खेळला तर त्याने कर्णधारपद स्वीकारावे, असे मला वाटते.”