MI vs RR: मुंबई इंडियन्सने लगावला ‘विजयाचा’ षटकार; राजस्थानला घरच्या मैदानात चारली पराभवाची धूळ

WhatsApp Group

IPL 2025: आयपीएल 2025 च्या 50 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा शानदार पराभव केला आहे. या सामन्यात मुंबईने राजस्थानला त्यांच्या घरच्या मैदानावर 2012 नंतर पहिल्यांदा पराभूत केलं आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या पहिल्या 4 फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सची जोरदार धुलाई करत आयपीएल 2025 मधील 50 व्या सामन्यात 200 पार मजल मारली आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट्स गमावून 217 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी पराभव झाला आहे.

रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 90 पेक्षा अधिक धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान हार्दिक आणि सूर्यकुमार या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे आता राजस्थानला विजयासाठी 218 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, राजस्थानला हे आव्हान पार करता आलं नाही.

रोहितने रचला इतिहास

या सामन्यात रोहितने मुंबई इंडियन्ससाठी इतिहास रचला. त्याने आपल्या फलंदाजीने विरोधी संघाविरुद्ध जोरदार फलंदाजी केली. रोहित शर्मा मुंबईसाठी 6 हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात हिटमनने अर्धशतकही झळकावले.

विजयाचा षटकार

मुंबईने या मोसमात आतापर्यंत सलग 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईने विजयाचा षटकार लगावला आहे. तर राजस्थानसाठी हा करो या मरोचा सामना होता, मात्र त्यांना यश मिळालं नाही.

दोन्ही संघ

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल आणि फजलहक फारुकी.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.