मुंबई इंडियन्सनं 2024 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला बाजूला करत हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात केलं. मुंबई इंडियन्सला या निर्णयाचा चांगलाच फटका बसला. पंड्याला कर्णधार केल्यामुळं क्रिकेट, रोहित आणि मुंबईचे चाहते नाराज चांगलेच नाराज झाले होते. 2024 च्या हंगामात मुंबईला फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला. आता 18 व्या मोसमात कमबॅक करण्यासाठी मुंबई इंडियन्सनं मोठा निर्णय घेतलाय. मुंबईनं आगामी हंगामासाठी 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. तसंच कर्णधाराचं नावही जाहीर केलं आहे.
कोणत्या खेळाडूंना मुंबईनं केलं रिटेन
मुंबईने हार्दिक पंड्या याला रिटेन केलं गेलं आहे. तसंच सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा हे देखील मुंबईकडून खेळणार आहेत. तर मुंबईचा रोहित शर्मा मुंबईसोबतच असणार आहे. रोहित मुंबईची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तसं काही झालेलं नाही. त्या फक्त अफवा होत्या.
मुंबईचा कर्णधार कोण?
मुंबईने गेल्या वर्षी हार्दिक पंड्याला कर्णधार मुंबईचा कर्णधार करण्यात आलं.सर्वात यशस्वी खेळाडूकडून कर्णधारपद काढून घेतल्याने बराच गदारोळ पाहायला मिळाला होता. रोहितने त्याच्या नेतृत्वात मुंबईला सर्वात यशस्वी संघ बनवलं. रोहितने मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी रोहितला कॅप्टन केलं जाणार, अशी चर्चा होती. मात्र, हार्दिक पंड्या हाच पुढील हंगामात मुंबईचा कर्णधार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.