IPL 2024 Schedule: आयपीएलचा ‘रन’संग्राम होतोय सुरू, पाहा IPLचं संपूर्ण वेळापत्रक
IPL 2024 Schedule: 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यांत वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, त्यात पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलचा आगामी हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार असून त्यात पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यात 7 एप्रिलपर्यंत 17दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
यंदा 22 मार्चपासून आयपीएलचा हंगाम सुरू होत आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेचच टी-20 विश्वचषकही खेळवला जाईल. अशा परिस्थितीत ही स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे काही खेळाडू आहेत ज्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वीच आपली नावे मागे घेतली आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामात खेळणाऱ्या सर्व 10 संघांची 2 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी केली जाईल, ज्यामध्ये एका गटातील संघ एकमेकांविरुद्ध 2 सामने खेळतील, तर दुसऱ्या गटातील संघांना एकच सामना खेळावा लागेल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली गेल्या मोसमात ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातही काही नवीन खेळाडूंचा समावेश होता, ज्यामध्ये रचिन रवींद्रच्या नावाचाही समावेश आहे. ज्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात आपल्या बॅटने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले.
आयपीएलच्या गेल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम सामना हरलेल्या गुजरात टायटन्स संघाला आगामी हंगाम सुरू होण्याआधीच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. जो अनफिट असल्यामुळे संपूर्ण स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. याशिवाय आत्तापर्यंत खेळलेल्या 2 आयपीएल सीझनमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळलेला गुजरात संघ 17 व्या मोसमात युवा खेळाडू शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. याशिवाय आयपीएलच्या या मोसमात ऋषभ पंतही बऱ्याच कालावधीनंतर मैदानात परतताना दिसणार आहे.
The wait is over 🥳
𝙎𝘾𝙃𝙀𝘿𝙐𝙇𝙀 for the first 2⃣1⃣ matches of #TATAIPL 2024 is out!
Which fixture are you looking forward to the most 🤔 pic.twitter.com/HFIyVUZFbo
— IndianPremierLeague (@IPL) February 22, 2024
संपूर्ण वेळापत्रक येथे पहा…
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च (चेन्नई)
- पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च (मोहाली)
- कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च (कोलकाता)
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च (जयपूर)
- गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च (अहमदाबाद)
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, 25 मार्च (बेंगळुरू)
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च (चेन्नई)
- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च (हैदराबाद)
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च (जयपूर)
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च (बेंगळुरू)
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 30 मार्च (लखनौ)
- गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च (अहमदाबाद)
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 31 मार्च (विशाखापट्टणम)
- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल (मुंबई)
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल (बेंगळुरू)
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 3 एप्रिल (विशाखापट्टणम)
- गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 4 एप्रिल (अहमदाबाद)
- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल (हैदराबाद)
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल (जयपूर)
- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल (मुंबई)
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल (लखनौ)