IPL 2024: 3 षटकार मारताच हिटमॅन रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरणार

0
WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 17 व्या हंगामात रोहित शर्मा दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 5 सामन्यात 10 षटकार मारले आहेत. तर मुंबई इंडियन्स संघ आज (14 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. या सामन्यात रोहित एक मोठा विक्रमही आपल्या नावावर करू शकतो.

रोहित शर्मा हा टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. रोहितने 431 सामन्यात 497 षटकार मारले आहेत. अशा परिस्थितीत जर तो चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 3 षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर टी-20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरेल. जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित हा पाचवा खेळाडू ठरणार आहे. त्याच्या आधी ख्रिस गेलने टी-20 क्रिकेटमध्ये 1056 षटकार, किरॉन पोलार्डने 860 षटकार, आंद्रे रसेलने 678 षटकार तर कॉलिन मुनरोने 548 षटकार मारून ही कामगिरी केली होती. रोहितने आतापर्यंत आयपीएल 2024 मध्ये 5 डावात 156 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 167 आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी खेळाडू सुरेश रैनाच्या नावावर आहे, ज्याने 30 सामन्यांमध्ये 710 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 27 सामन्यात 700 धावा केल्या आहेत. जर रोहितने आणखी 11 धावा केल्या तर तो रैनाला मागे टाकून पहिल्या स्थानावर पोहोचेल.