IPL 2024: पीयूष चावलाने मोडला ड्वेन ब्राव्होचा खास विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा गोलंदाज

0
WhatsApp Group

Most wickets in IPL, Piyush Chawla: आयपीएल 2024 च्या 51 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियुष चावलानेड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडत आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे.

7व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पियुष चावलाने रिंकू सिंगला झेलबाद केले. रिंकूने 8 चेंडूत 9 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 चौकार मारले. रिंकूच्या विकेटसह पीयूष चावलने आयपीएलमध्ये 184 विकेट पूर्ण केल्या. ड्वेन ब्राव्होने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 183 बाद केले होते. यासह पियुष चावला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत आघाडीवर आहे युझवेंद्र चहल, ज्याने लीगमध्ये 200 विकेट घेतले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू 

  • 200 बळी: युझवेंद्र चहल
  • 184 बळी: पियुष चावला
  • 183 बळी: ड्वेन ब्राव्हो
  • 178 बळी: भुवनेश्वर कुमार

आयपीएल 2024 मध्ये पियुष चावलाच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो 8 सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने 24 च्या सरासरीने आणि 9.5 च्या इकॉनॉमीने 5 विकेट्स घेतल्या आहेत. 1/15 ही त्याची चालू हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.