IPL 2024 MI vs RR: राजस्थानने नाणेफेक जिंकली, मुंबईची फलंदाजी

WhatsApp Group

IPL 2024 MI vs RR: IPL 2024 चा 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मोसमात मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर पहिला सामना खेळत आहे. या मोसमात आतापर्यंत मुंबई इंडियन्सने दोन सामने खेळले असून, हार्दिक पांड्याच्या संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राजस्थान रॉयल्सने आपले दोन्ही सामने जिंकले असले तरी आता हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर खेळवला जात असल्याने राजस्थानचा तणाव थोडा वाढला आहे. कारण आरसीबी वगळता इतर सर्व संघांनी त्यांच्या घरच्या मैदानावर सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ 28 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी मुंबईने 15 सामने तर राजस्थानने 12 सामने जिंकले आहेत.