IPL 2024: गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा तीन गडी राखून केला पराभव

0
WhatsApp Group

PBKS vs GT : आयपीएल 2024 च्या 37 व्या सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब किंग्ज संघाने 20 षटकांत सर्वबाद 142 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी 120 चेंडूत 143 धावांची गरज होती. गुजरात टायटन्सने हा सामना तीन गडी राखून जिंकला आहे.

पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकांत पंजाबला केवळ 142 धावाच करता आल्या. पंजाबसाठी सर्वात मोठी खेळी प्रभसिमरन सिंगने खेळली, जो 21 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 35 धावा काढून बाद झाला. पंजाबकडून एकाही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. कर्णधार सॅम कुरन सलामीला आला आणि 19 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रिली रुसो 9, जितेश शर्मा 13, लियाम लिव्हिंगस्टोन 6, शशांक सिंग 8, आशुतोष शर्मा 3, हरप्रीत सिंग भाटिया 14, हरप्रीत ब्रार 29 धावा करून बाद झाले. संपूर्ण संघ 20 षटकात 142/10 धावाच करू शकला.