IPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

0
WhatsApp Group

IPL 2024 RCB: IPL 2024 मध्ये लागोपाठच्या पराभवांमुळे अडचणीत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा तणाव आणखी वाढला आहे. संघाच्या स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 मधून ब्रेक घेतला आहे. या मोसमात आतापर्यंत या खेळाडूची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 सीझन-17 मधून ब्रेक घेतला आहे. शनिवार, 15 मार्च रोजी, आयपीएल 2024 चा 30वा सामना आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मॅक्सवेल खेळला नाही.

मॅक्सवेल या मोसमात आतापर्यंत अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसत होता. मॅक्सवेल प्रत्येक सामन्यात संघाची निराशा करत होता. एकाही सामन्यात त्याच्या बॅटमधून एकही चांगली खेळी झाली नाही. त्यानंतर मॅक्सवेलवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या हंगामात, मॅक्सवेलने 6 सामने खेळले, ज्यात त्याने 5.33 च्या सरासरीने आणि 94.11 च्या स्ट्राइक रेटने केवळ 32 धावा केल्या. या काळात मॅक्सवेलही तीनवेळा शून्यावर बाद झाला.

आयपीएल 2024 मधून ब्रेक घेण्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की माझ्या जागी संघात दुसऱ्याला संधी देणे हा माझ्यासाठी सोपा निर्णय आहे. मला स्वतःला थोडी मानसिक आणि शारीरिक विश्रांती देण्याची गरज आहे. याबाबत मी प्रशिक्षक आणि कर्णधाराशी बोललो होतो. जर संघाला माझी आणखी गरज भासली तर मी निश्चितच ठोस मानसिकतेने पुनरागमन करेन.

पराभवानंतर आरसीबीला धक्का
आरसीबीसाठी हा मोसम आतापर्यंत खूपच खराब राहिला आहे, संघाने आतापर्यंत 7 पैकी 6 सामने गमावले आहेत. आरसीबीला आतापर्यंत फक्त एकच विजय मिळाला आहे. गुणतालिकेत संघ 10व्या स्थानावर आहे. येथून आणखी एक पराभव आरसीबीला प्लेऑफमधून बाहेर फेकून देईल.