IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

0
WhatsApp Group

आता आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंतच्या टीम दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. एकीकडे दिल्लीसाठी हा हंगाम फारसा खास राहिला नाही, संघाने आतापर्यंत 8 सामन्यांपैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत आणि पंतचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे, त्यामुळे या धोकादायक अष्टपैलू खेळाडूच्या बाहेर पडण्याने दिल्लीच्या अडचणी वाढल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. मिशेल मार्श सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसला होता. मात्र नंतर मार्श दुखापतीमुळे पुढील काही सामन्यांतून बाहेर होता. आता गंभीर दुखापतीमुळे मिचेल मार्शला या संपूर्ण मोसमातून बाहेर व्हावे लागले आहे.