27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे आता मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनलाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BBCI) दंड ठोठावला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यादरम्यान किशनने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केले होते, त्यानंतर बीसीसीआयने त्याची मॅच फी कापली आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने इशान किशनला दंड ठोठावला आहे. आयपीएलने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात अशी माहिती देण्यात आली आहे की, इशान किशनला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. इशान किशनने त्याची चूक मान्य केली आहे जी लेव्हल 1 अंतर्गत येते, त्यानंतर आम्ही त्याची मॅच फी 10 टक्क्यांनी कमी केली आहे. लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो. आयपीएल आचारसंहितेचा अनुच्छेद 2.2 सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे यांच्या गैरवापराशी संबंधित आहे.
नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघासाठी आतापर्यंतचा आयपीएल हंगाम अपेक्षेप्रमाणे राहिला नाही, ज्यामध्ये त्यांना 9 पैकी केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. गुणतालिकेत संघ 9व्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबई संघाने 20 षटकात 257 धावा केल्या, त्यानंतर त्यांना केवळ 247 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्ससाठी या सामन्यात फक्त तिलक वर्माने अर्धशतक झळकावले ज्यात त्याने 63 धावांची खेळी केली.