विराट कोहली पुन्हा बनला कर्णधार! प्लेसीस असतानाही विराट कर्णधार कसा? जाणून घ्या

WhatsApp Group

IPL 2023: IPL 2023 चा 27 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीच्या वेळी विराट कोहली कर्णधार म्हणून नाणेफेक करण्यासाठी मैदानात दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला Virat Kohli captains RCB .

2021 सालापासून आरसीबीचे कर्णधारपद सोडलेला विराट कोहली एका वर्षानंतर संघाची धुरा सांभाळताना दिसला. विराट कोहलीला कर्णधार म्हणून पाहून प्रत्येक चाहत्यांना आनंद झाला आणि विराटचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले.

का घेतला हा निर्णय? : इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमांमुळे पंजाबविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आलं होतं. फाफ डू प्लेसिस Faf du Plessis हा प्लेइंग 11 चा भाग होता, परंतु इम्पॅक्ट खेळाडूंच्या नियमांमुळे तो दुसऱ्या डावात बाहेर पडला. यामुळेच या सामन्यात विराट कर्णधार करताना दिसला.


विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यापासून तो कोणत्याही संघाचा कर्णधार बनलेला नाही. अशा परिस्थितीत विराट आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी गोष्ट आहे. विराट कोहलीने आरसीबीसाठी कर्णधार म्हणून एकूण 140 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 64 सामने जिंकले आहेत तर 69 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.