IPL 2023 : मुंबईचा पराभव करत गुजरातचा फायनलमध्ये प्रवेश!

0
WhatsApp Group

क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आता 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाने सलग दुसऱ्या सत्रात अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना शुभमन गिलने 129 धावांची शतकी खेळी केली. गोलंदाजीत मोहित शर्माने पाच विकेट घेत सामना मुंबईच्या हातून दूर नेला.