IPL 2023 : गुजरातचा पराभव करत चेन्नईचा फायनलमध्ये प्रवेश!

0
WhatsApp Group

आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुजरात टायटन्ससमोर होता. चेन्नई संघाने हा सामना 15 धावांनी जिंकला आहे. यासह CSK हा IPL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 10 गडी गमावून 157 धावाच करू शकला.

या सामन्यात गुजरात संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. सलामीला आलेल्या शुभमन गिलने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याचवेळी त्याला साथ देण्यासाठी आलेल्या वृद्धिमान साहाने केवळ 12 धावा केल्या. यानंतर कर्णधार हार्दिक 8, दासून शनाका 17, डेव्हिड मिलर 4, विजय शंकर 14 आणि राहुल तेवतिया 3 धावा करू शकले. शेवटी रशीद खानने 30 धावांची खेळी करत गुजरातला 150 च्या पुढे नेले. चेन्नईकडून महिश तिक्ष्णा, रवींद्र जडेजा, मथिसा पाथिराना आणि दीपर चहर यांनी 2-2 विकेट घेतल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK संघाने 7 गडी गमावून 172 धावा केल्या. चेन्नईकडून डावाची सुरुवात करणाऱ्या रुतुराज गायकवाडने 44 चेंडूत 60 धावा केल्या. याशिवाय डेव्हन कॉनवेच्या बॅटमधून 40 धावांची खेळीही झाली. त्याचवेळी अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांनी 17-17 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने 22 धावांची खेळी खेळली. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने 2-2 बळी घेतले.

दोन्ही संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज: रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार व विकेट किपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महिश तिक्ष्णा