‘या’ तारखेपासून सूरू होणार आयपीएल 2022!

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाचे वेळापत्रक जवळपास निश्चित केले आहे. BCCI ने अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही, परंतु सर्व संघ मालकांना सांगण्यात आले आहे की आयपीएल 2022 चा पहिला सामना 2 एप्रिलला खेळवला जाऊ शकतो.

बीसीसीआयने यापूर्वीच जाहीर केले आहे की, यावेळी आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतातच खेळवला जाईल. कोरोनामुळे IPL-14 चा दुसरा टप्पा UAE मध्ये खेळवण्यात आला होता. मात्र आता आयपीएलच्या पुढच्या हंगामातील सर्व सामने भारतात होणार आहे.

सुत्रानी दिलेल्या महितीनुससार, IPL चा अंतिम सामना 4 किंवा 5 जून रोजी खेळवला जाऊ शकतो. यावेळी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ सहभागी होणा आहेत. नव्या मोसमात 2 नवीन संघ वाढल्याने सामन्यांची संख्याही वाढणार आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये 60 सामने खेळवले जातात मात्र नव्या मोसमात 60 ऐवजी 74 सामने खेळण्यात येणार आहेत. सर्व संघांना पूर्वीप्रमाणे 14-14 सामने खेळावे लागतील, यातील 7 सामने घरच्या मैदानावर तर उर्वरीत 7 सामने दुसऱ्या शहरात खेळावे लागणार आहेत.

डिसेंबरमध्ये होणार खेळाडूंचा मेगा ऑक्शन

आयपीएलच्या पुढील हंगामासाठी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. तारखा अजून ठरलेल्या नाहीत. लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आयपीएल 2022 मध्ये सहभागी होणार आहेत. आरपी संजीव गोयंका ग्रुपने लखनौ संघा 7 हजार 90 कोटी रुपयांना संघ विकत घेतला आहे. त्याचवेळी सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादचा संघ 5 हजार 200 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

आयपीएल 2022 भारतातच होणार

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच घोषणा केली आहे की पुढील हंगाम भारतातचं खेळवला जाईल. चेन्नईने 14वा हंगाम जिंकल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, मला माहित आहे की तुम्हा सर्वांना चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा सामना पाहायचा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आयपीएलचा पुढील हंगाम हा भारतातचं खेळवला जाणार आहे.

2 नव्या संघांमुळे बीसीसीआय झाली मालामाल

क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी आणि श्रींमत टी20 लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलमधून बीसीसीआय दरवर्षी बक्कळ पैसा मिळतो. या वर्शी तर आयपीएल सुरू व्हायच्या आधीच अहमदाबाद आणि लखनौ संघाकडून बीसीसीआयला तब्बल 12 हजार कोटी मिळाले आहेत.