
आयपीएलमध्ये २०२२ मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली आणि यावेळी रविचंद्रन अश्विनने दमदार फलंदाजी करत संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने अर्धशतक ठोकले, जे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रविचंद्रन अश्विनने ३८ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा केल्या. अश्विनने प्रथम यशस्वी जैस्वाल सोबत ४३ धावा आणि नंतर देवदत्त पडिक्कल सोबत ५३ धावांची भागीदारी केली.
FIFTY for @ashwinravi99 off 37 deliveries ????????
Live – https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL pic.twitter.com/URuuIDfIyp
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022
2022 आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विन अनेक वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे, ज्यामध्ये त्याने दमदार फटकेबाजी करत वेगवान धावा केल्या आहेत.
रविचंद्रन अश्विनच्या या अर्धशतकाने एक विशेष विक्रमही केला आहे. सर्वाधिक डावानंतर पहिले अर्धशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. रविचंद्रन अश्विनने ७२ व्या डावात आयपीएलचे पहिले अर्धशतक केले. या यादीत सर्वात पुढे रवींद्र जडेजाचे नाव आहे त्याने १३२ व्या डावात आयपीएलचे पहिले अर्धशतक केले.
पहिल्या अर्धशतकासाठी सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू (आयपीएल)
- रवींद्र जडेजा १३२
- रविचंद्रन अश्विन ७२
- हरभजन सिंग ६१
- स्टीव्हन स्मिथ ३१