१० षटकार आणि १० चौकांरासह क्विंटन डी कॉकने चोपल्या १४० धावा, IPL मध्ये रचला इतिहास

WhatsApp Group

आयपीएल २०२२ सह स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी शानदार खेळ दाखवला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुणतालिकेमध्ये लखनऊचा संघ सुरुवातीपासूनच अव्वल ४ मध्ये आहे. त्याचवेळी, आता संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळत आहे. या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी अप्रतिम खेळी करत विक्रम केला.

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएल २०२२ च्या ६६ व्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. लखनऊकडून quinton de kock क्विंटन डी कॉक १४० आणि कर्णधार KL rahul केएल राहुल ६८ धावांवर नाबाद माघारी परतले. डी कॉकने मोसमातील पहिले शतक झळकावले. त्याने ७० चेंडूत १० चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद १४० धावा केल्या.

आयपीएलमधील डि कॉकची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचवेळी कर्णधार केएल राहुलने ५१ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ४ षटकार मारले. दोघांनी २१० धावांची सलामी भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.