IPL 2022: गुजरातची फायनलमध्ये एन्ट्री! राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय

WhatsApp Group

गुजरात आणि राजस्थान यांच्यातील प्लेऑफचा पहिला सामना अर्थात क्वॉलिफायर-१ Gujarat vs Rajasthan , Qualifier 1 चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापंर्यंत चाललेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुजरातने आता फायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. तर पराभव झालेल्या राजस्थानला आणखी एक संधी असून हा संघ क्वॉलिफायर-२ मध्ये २७ मे रोजी एलिमिनेटर सामन्यामधील विजेत्याशी दोन हात करेल. राजस्थानने गुजरातसमोर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातने ही धावसंख्या सात गडी राखून गाठली.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या Hardik Pandya व डेव्हिड मिलर David Miller यांनी दमदार खेळी केली आणि गुजरातला विजय मिळवून दिला. या दोघांनी ६० चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण करताना गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. विजयासाठी ६ चेंडूंत १६ धावा हव्या असातना मिलरने ६ ,६,६ असा तीन चेंडूंत सामना संपवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gujarat Titans (@gujarat_titans)

बटलरच्या दमदार खेळीमुळे राजस्थानचा संघ चांगली धावसंख्या उभी करु शकला. बटलरला संजू सॅमसनने साथ दिली. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत २६ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार लगावत ४७ धावा केल्या. बटलर आणि संजू सॅमसन या जोडीला देवदत्त पडिक्कलने २० चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. हे तीन फलंदाज वगळता राजस्थानचा एकही खेळाडू चांगली फलंदाजी करु शकला नाही. राजस्थानने वीस षटके संपेपर्यंत १८८ धावा केल्या.

राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातची खराब सुरुवात झाली. गुजरातचा सलामीवर वृद्धीमान साहा पहिल्याच षटकात एकही धाव न करता झेलबाद झाला. त्यानंतर सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड या जोडीने चांगली खेळी केली. या जोडीने ७२ धावांची भागिदारी केली ज्यामुळे गुजरातचा डाव सावरला. मात्र संघाच्या ७२ धावा झालेल्या असताना शुभमन गिल धावबाद झाला. तसेच नंतर संघाच्या ८५ धावा झालेल्या असताना मॅथ्यू वेडदेखील झेलबाद झाला.

आघाडीचे हे दोन्ही फलंदाज तंबुत परतल्यामुळे गुजरात संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर मात्र कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर या जोडीने सावध पवित्रा घेत फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने २७ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या तर मिलरने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकार लगावत नाबाद ६८ धावा केल्या. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर गुजरातला फायनलमध्ये एन्ट्री करता आली.