IPL 2022: ‘या’ ठिकाणी रंगणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार

WhatsApp Group

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अर्धे सामने संपले आहेत. त्यानंतर अंतिम आणि क्वॉलिफायर सामने कोणत्या स्टेडियमवर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी अंतिम आणि क्वॉलिफायर सामने कोणत्या स्टेडीयमवर आणि कधी खेळवले जाणार याची अधिकृत घोषणा केली आहे.

जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्लेऑफ आणि अंतिम सामने अहमदाबाद आणि कोलकाता येथे खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

तसेच याच स्टेडियमवर २७ मे रोजी क्वॉलिफायर २ देखील खेळवला जाईल. तसेच क्वॉलिफायर १ आणि एलिमिनेटर सामने कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर २४ आणि २५ मे रोजी खेळवले जाणार आहेत.