पृथ्वी शॉवर मोठी कारवाई, लखनौविरुद्धच्या सामन्यात ‘या’ चुकीमुळे ठोठावण्यात आला दंड

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पाचवा पराभव झाला आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीचा 6 धावांनी पराभव केला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली नऊ सामन्यांत पाच विजयांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

या सामन्यातील पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी संघाचा फलंदाज पृथ्वी शॉला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याला मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. लखनौविरुद्ध अवघ्या पाच धावा करून पृथ्वी दुष्मंता चमीराचा बळी ठरला.

पृथ्वी शॉने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा स्वीकारला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल-1 भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे. विरोधी खेळाडू किंवा पंचांविरुद्ध कोणत्याही प्रकारचे हावभाव करणे हा आयपीएल आचारसंहितेचा लेव्हल-1 गुन्हा मानला जातो.