
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने या मोसमात सलग आठ सामने गमावल्यानंतर मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जला (CSK) सोमवारी सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत तर सीएसकेने चार आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत, परंतु या हंगामात या दोन संघांनी खूप निराश केली आहे. चेन्नई अजूनही प्लेऑफमध्ये कसे पोहोचू शकते याचे संपूर्ण समीकरण समजून घेऊया.
चेन्नईने एकूण आठ सामने खेळले आहेत आणि यापैकी दोन सामने जिंकले आहेत, अशा प्रकारे संघाच्या खात्यात सध्या चार गुण आहेत, तर निव्वळ धावगती -0.538 आहे. सीएसकेला अजून सहा सामने खेळायचे आहेत. जर सीएसकेने त्यांचे उर्वरित सहा सामने जिंकले तर संघाच्या खात्यात 16 गुण होतील. सीएसकेला फक्त उर्वरित सामने जिंकावे लागणार नाहीत, तर नेट रनरेटवरही लक्ष ठेवावे लागेल.
प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी 16 गुण पुरेसे असू शकतात. अशा परिस्थितीत चेन्नईने उर्वरित सामन्यांमध्ये सर्व सामने जिंकले आणि नेट रनरेटमध्येही सुधारणा केली तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, तरीही चेन्नईला उर्वरित सामन्यांच्या निकालांवर लक्ष ठेवावे लागेल. या हंगामात धोनीऐवजी रवींद्र जडेजा संघाची धुरा सांभाळत आहे.