International Yoga Day 2024 Wishes: योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश

WhatsApp Group

International Yoga Day 2022 Wishes: योग म्हणजे जोडणे. शरीर, मन, बुद्धी यांना एकत्रित जोडणारे शास्त्र म्हणजे योग. भारताचे हे अत्यंत प्राचीन शास्त्र आता ग्लोबल झाले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच योगाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच आता जागतिक स्तरावर योग दिन साजरा होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जूनला पूर्ण जगभरात साजरा केला जात असून .संयुक्त राष्ट्रांनीही याला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. यावर १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या याला पाठिंबा दिला होता.

योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश Messages तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन योगप्रेमींचा दिवस खास करा.

  • योग करेल रोज त्यापासून दूर राहील रोग आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
  • चला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करू या , आपण जगभर योग पसरुया.
  • आपले आरोग्य ही खरी संपत्ती आहे सोने आणि चांदीचे तुकडे नाहीत म्हणून योगाद्वारे आरोग्य टिकवा.
  • निर्धार नियमित योग करण्याचा आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
  • योग आपल्याला अशी ऊर्जा देते जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही. योग दिन शुभेच्छा.
  • स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे, रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.
  • योग म्हणजे मनातील चढउतार स्थिर करण्याची प्रक्रिया मन शांत करण्याचा योग म्हणजे योग.
  • योगाचा नियमित सराव करा, आयुष्य आनंदी आणि निरोगी करा!
  • आमच्याकडे प्राचीन काळात आरोग्य विमा नव्हता परंतु एक पैसा खर्च न करता आपल्या आरोग्याची हमी देणारा एक अभ्यास म्हणून आपल्या सर्वांमध्ये योग आहे.
  • 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन योग आहे आरोग्यासाठी क्रांती तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

 

  • योग चैतन्य, एकाग्रता आणि उत्पादकता वाढवते; हे मानवी शरीर, मन आणि माणसाची भावना स्थिर करते.
  • आपल्याला योग करण्याची सर्वात आवश्यक साधने म्हणजे आपले शरीर आणि आपले मन.
  • आजच्या काळात आपण स्वतःपासून डिस्कनेक्ट झालो आहोत. म्हणून, योगासने आम्हाला स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्यास मदत करते.
  • योग केवळ आत्म सुधारणेबद्दल नाही, ते आत्म-स्वीकृतीबद्दल शिकवते.
  • मोबाइल फोन ज्या प्रकारे जीवनाचा एक भाग बनला आहे, आपण योगालाही आपल्या जीवनाचा एक भाग बनवू शकता.