Shehnaaz Gill Bday: ‘पंजाबची कतरिना कैफ’ शहनाज गिलबद्दल जाणून घ्या ‘या’ गोष्टी

WhatsApp Group

पंजाबची ‘कतरिना कैफ’ म्हणजेच सर्वांची आवडती शहनाज गिल आज (शुक्रवारी) तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘बिग बॉस 13’ मधून लोकप्रिय झालेली शहनाज लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे, तिची निरागसता आणि सौंदर्य सगळ्यांनाच तिचे वेड लावते. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शहनाज गिल म्हणजे शहनाज कौर गिल जी शीख कुटुंबातील आहे. आज आम्ही तुम्हाला शहनाजशी संबंधित अशाच काही रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

‘पंजाबची कतरिना कैफ’
शहनाज गौर गिलचा जन्म 27 जानेवारी 1993 रोजी एका शीख कुटुंबात झाला. तिची आई परमिंदर कौर गिलने एका मुलाखतीत सांगितले की, शहनाज जेव्हा 16-17 वर्षांची होती तेव्हा सगळे तिला ‘कतरिना’ म्हणायचे. शहनाजला ‘पंजाबची कतरिना कैफ’ असेही म्हटले जाते. शहनाजला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, तिने अगदी लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. अभिनयाची स्वप्ने पाहण्यात गुंतलेल्या शहनाजला अभ्यास करावासा वाटला नाही, तरीही तिने पंजाबमधील एका विद्यापीठातून बॅचलरची पदवी मिळवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये केले आहे काम 
पंजाबी इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या शहनाजने 2015 मध्ये तिचा पहिला म्युझिक व्हिडिओ ‘शिव दी किताब’ केला होता, जो गुरविंदर ब्रारने गायला होता. मात्र, शहनाज गिलला ‘माझे दी जट्टी’ आणि गॅरी संधूचा लोकप्रिय म्युझिक व्हिडिओ ‘होली-होली’ या म्युझिक अल्बममधून लोक ओळखतात. शहनाज गिलने एकदा खुलासा केला होता की तिने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. शहनाजच्या घरच्यांना तिचे लग्न करायचे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाज म्हणाली होती की, ‘जेव्हा मी शूटिंगवरून रात्री उशिरा जायची, तेव्हा घरात खूप गोंधळ व्हायचा, घरातील लोकांशी सतत भांडण होत असल्याने मी लग्न केले नाही. मी घर सोडले आणि त्यांच्याशी माझे नाते संपवले. मात्र, माझी लोकप्रियता पाहून माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझा खूप अभिमान वाटला. शहनाजला पंजाबच्या बाहेर ‘बिग बॉस 13’मधून बंपर फेम मिळाली, शोमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची जोडी खूप आवडली. शोच्या बाहेरही दोघे चांगले मित्र राहिले, परंतु सिद्धार्थ शुक्लाच्या दुर्दैवी मृत्यू झाला.