
काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. तथापि, जेव्हा आपले विचार संघर्षाच्या मार्गाने मोडण्यास सुरवात करतात, तेव्हा अशा वेळी एखाद्यास आवश्यक असते जो आपल्याला पुन्हा उभे राहण्याची (marathi suvichar) प्रेरणा देऊ शकेल.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यशस्वी आणि महान लोकांद्वारे दिलेल्या यशाचे काही मूलभूत सुविचार सांगणार आहोत, जे कठीण परिस्थितीत आपले सामर्थ्य निर्माण करून पुढे जाण्यासाठी प्रेरणा घेऊ शकतात.
1) “जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही”
2) “श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे व्यक्तीमत्व.”
3) “भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.”
4) “जगात 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का?
5) “परिस्थितीच्या हातातली कधीच कठ पुतळी बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.”
6) “यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.”
7) “ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे, तेवढयाच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.
8) “दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही.”
9) “आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे काही फरक पडत नाही कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!
10) “कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”
11) “आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात !!
12) “आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवयी बदलू शकता! आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलेल !!
13) “जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
14) “जे लोक हटके आहेत ते इतिहास रचतात हुशार लोक त्यांच्याबद्दलच वाचतात!!!
15) “दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही,जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.”
16) “आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं”
17) “आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.”
18) “संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”
19) “जबाबदाऱ्या भाग पाडतात गाव सोडायला नाही तर कोणाला आवडत घर सोडून रहायला”.
20) “स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही!!!
21) “संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही.”
22) “टीकाकारांनचा नेहमी आदर करा ,कारण ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात”
23) “मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले! हुशार माणसाची ओरड ऐकावी !!
24)“जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात.”