काँग्रेस नेता कन्हैया कुमारवर अ‍ॅसिड हल्ला?

WhatsApp Group

लखनऊ – काँग्रेस नेता कन्हैया कुमारवर ink thrown at Kanhaiya Kumar  एका युवकाने खनऊमध्ये शाई फेकली. काँग्रेस कार्यालयातच ही घटना घडली असून, ही शाई नसून अ‍ॅसिड असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. शाई फेकणारा तरुण पकडला गेला आहे, देवांश बाजपेयी असे अटक तरुणाचे नाव आहे.


काँग्रेसचा युवा नेता कन्हैया कुमार काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी लखनऊला पोहोचला होता. मंगळवारी ते लखनऊ येथील काँग्रेस कार्यालयात होता. लखनऊ सेंट्रल मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सदफ जफर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कन्हैया कुमार आला असता त्याच्यावर हे केमीकल / अ‍ॅसिड फेकल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.