Singer KK Death: चेहरा आणि डोक्यावर जखमा! गायक केकेच्या मृत्युप्रकरणी बीजेपीने उपस्थित केला सवाल

WhatsApp Group

Singer KK Death: प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ अर्थात केके (Singer KK) यांचे मंगळवारी अकाली निधन झालं. तो 53 वर्षांचा होता. कोलकात्यामध्ये एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना केकेला हृदयविकाराचा झटका (Singer KK Died) आला. तो स्टेजवरच कोसळला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यातही आले परंतु त्याला डॉक्टरांनी मृत (Singer KK Passes Away) घोषित केले. केकेच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडसह संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दुसरीकडे, केकेच्या मृत्युप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) केकेच्या मृत्यूप्रकरणी सवाल उपस्थित केला आहे. केकेचा चेहरा आणि डोक्यावर जखमा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी कोलकाता पोलिसांकडे अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून गुन्हा देखील दखल करण्यात आला आहे. पोलिस हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गायक केकेच्या मृत्युप्रकरणी भाजपने सवाल उपस्थित केला आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. दिलीप घोष यांनी केकेच्या लाईव्ह कॉन्सर्टच्या चौकशीची मागणी केली आहे. एसीशिवाय आणि एवढ्या गर्दीमध्ये केकेला परफॉर्म करावा लागला. कार्यक्रमाला क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होती त्यात एसी बंद होते. या कारणामुळे केकेची तब्येत बिघडली की काय? असं देखील घोष यांनी म्हटलं आहे.