पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटकही केली आहे. आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलरने मुंबईतील बीकेसी कार्यालयाला पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. फोन करणाऱ्याने आपले नाव पनयम शिवानंद असं सांगितलंअसून तो हैदराबादचा रहिवासी असल्याचे सांगितले.
A caller threatened Mumbai’s BKC office about placing a bomb at the Pune Google office. Caller told that his name is Panayam Shivanand & is from Hyderabad. Nothing suspicious was found in probe. The caller has been detained & case filed against him: Mumbai Police
— ANI (@ANI) February 13, 2023
तपासादरम्यान हे प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न झाले
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करण्यात आला, मात्र तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. फोन करणाऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गुगलच्या मुंबई कार्यालयाला धमकीचा फोन आला, ज्यामध्ये गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. हैदराबादमध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक अहवालानुसार, मुंबईतील बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे.