महागाईचा भडका! गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1000 पार

WhatsApp Group

सततच्या वाढत्या महागाईमुळे (Inflation) त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे. कारण तेल कंपन्यांनी पुन्हा एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरामध्ये वाढ केली आहे.

त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरसोबतच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. आता देशात घरगुती गॅस सिलिंडर (Domestic Gas Cylinder) 1000 रुपये पार झाला आहे. तर घरगुती गॅस सिलेंडर व्यतिरिक्त कमर्शियल गॅस सिलेंडरदेखील (commercial gas cylinder) महाग झाला आहे.

तेल कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनुसार आज घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 3 रुपये 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर देशात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 1000 च्या पुढे गेला आहे.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर व्यतिरिक्त कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर देखील 8 रुपयांनी महाग झाला आहे. आजपासून 19 किलो वजनाच्या सिलेंडरसाठी दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईमध्ये 2507 रुपये मोजावे लागणार आहेत.