CNG PNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ

WhatsApp Group

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने मुंबईतील सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. 5 नोव्हेंबरपासून मुंबईकरांना एका किलो सीएनजीसाठी 86 रुपयांऐवजी 89.50 रुपये मोजावे लागतील, तर पीएनजीसाठी 54 रुपये प्रति एससीएम मोजावे लागतील.

सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने ऑटो-टॅक्सी भाडे वाढवण्याची मागणी पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते. 1 ऑक्टोबरलाच भाडे वाढवण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे सुरुवातीचे भाडे 28 रुपये असून ते 30 रुपये केले जाऊ शकते.

1 जुलै 2021 रोजी मुंबईत CNG ची किंमत 49.40 रुपये प्रति किलो होती. यानंतर सीएनजीच्या दरात जवळपास दर दोन महिन्यांनी वाढ होत आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी मुंबईत CNG ची किंमत प्रति किलो 80 रुपये आहे. एका तिमाहीत सीएनजीचे दर किलोमागे 40 रुपयांनी वाढले आहेत.