‘हमारा बजाज’ काळाच्या पडद्याआड, उद्योजक राहुल बजाज यांचे ८३ व्या वर्षी निधन

WhatsApp Group

पुणे –  दिग्गज उद्योगपती यांचे आज वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे Rahul Bajaj passes away. गेले २ महिने ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बजाज ग्रुपने राहुल बजाज यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

उद्योग क्षेत्रातील दिलेल्या अमूल्य योगदानासाठी राहुल बजाज यांना २००१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल बजाज हे राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. बजाज समूहाला उंचीवर नेण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा होता.


राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे झाला. 1960 च्या दशकात त्यांनी बजाज समूहाचे नेतृत्व स्वीकारले. 2005 मध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा त्याग केला आणि त्यांचा मुलगा राजीव बजाजकडे बजाजची सूत्रे सोपवली.

राहुल बजाज यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी आणि बॉम्बे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले होते.

हेही वाचा 

‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम