उणे 40°C तापमान, 15000 फूट उंची.. प्रजासत्ताक दिनी भारताच्या हिम योद्ध्यांनी फडकवला तिरंगा

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारत देश आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. १९५० मध्ये या दिवशी देशाची राज्यघटना लागू करण्यात आली. दिल्लीतील राजपथावरील परेडमध्ये भारतीय सैन्याचे शौर्य पाहायला मिळालेच त्यासोबतच भारताची सांस्कृतिक प्रतिमाही पाहायला मिळाली.

दुसरीकडे, प्रजासत्ताक दिनी उत्तराखंड, हिमाचल आणि लडाखमध्ये १५००० फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा उत्साहही उंचावला होता. आयटीबीपीच्या या हिमवीरांनी उणे ४० डिग्री सेल्सिअस तापमानात आणि १५००० फूट उंचीवर तिरंगा फडकवला ITBP personnel celebrate Republic Day.

लडाखमध्ये -40 अंश सेल्सिअस तापमानही सैनिकांचा उत्साह कमी करू शकला नाही
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या जवानांनी लडाखमध्ये -40°C तापमानावर १५,००० फूट उंचीवर तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केला.

उत्तराखंडमध्येही जवानांनी दाखवले शौर्य

हिमाचल प्रदेशात प्रजासत्ताक दिनी ITBP च्या जवानांनी १६,००० फूट उंचीवर तिरंगा फडकवला.