विमानात प्रवाशाच्या फोनला आग; मोठी दुर्घटना टळली

WhatsApp Group

नवी दिल्ली – विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलला आग लागल्याची घटना घडली आहे. इंडिगोच्या A320 विमानामध्ये ही घटना घडली. यावेळी विमानामध्ये एका प्रवाशाच्या मोबाईल फोनमधून अचानक स्पार्किंग आणि धूर निघू लागला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर केबिन क्रूला याची माहिती देण्यात आली. विमान कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली.

डीजीसीएच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं की, इंडिगोचे A320 निओ विमान VT-IJV कीप फ्लाइट क्रमांक 6E-2037 आसाममधील दिब्रुगढहून दिल्लीमध्ये येत होते. यादरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलमध्ये स्पार्किंग होऊन धूर येऊ लागला. याची माहिती तातडीने केबिन क्रूला कळवण्यात आली. यानंतर केबिन क्रूच्या सदस्यांनी केबिन अग्निशमन यंत्राच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या दरम्यान कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यातम आलं आहे.

डीजीसीएनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विमान दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) सुरक्षितपणे उतरले. इंडिगोने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, दिब्रुगढ ते दिल्लीच्या फ्लाइटमध्ये मोबाईलमधून धूर निघत असल्याची घटना घडली आहे. क्रू मेंबर्सनी वेळ न घालवता त्वरीत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. विमानातील कोणत्याही प्रवाशाचे किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.