”एक दौरा केला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

WhatsApp Group

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीनंतर अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आलं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता के रणनीती आखणार याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “निवडणुकीत काय होतं हे आमच्यापेक्षा जवळून कोणी पाहिलेलं नाही. शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणात 55 वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक चढ उतार पाहिले. जेवढे चढ आले, तेवढेच उतारही त्यांच्या अनुभवाला आले. त्यांची 27 वर्ष सत्तेत आणि 27 वर्ष विरोधात गेली. मी त्यांना नेहमीच सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रेम दिलंच, पण विरोधात अधिक प्रेम या महाराष्ट्राने तुम्हाला दिलं असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

शरद पवार जेव्हा विरोधात असतात तेव्हा ते दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. एक दिवस महाराष्ट्राचा दौरा केला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात,” असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केली.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा